केज दि.२८ – तू बांधावरून म्हैस घेऊन का जातोस ? असे म्हणत दोघा भावांनी एका ४० वर्षीय शेतकऱ्यास कुऱ्हाड व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उंदरी येथील शेतकरी बाबुराव जनक चव्हाण ( वय ४० ) हे २७ जुलै रोजी बडगळ नावाच्या शेतातून म्हैस घेऊन जात होते. त्यांना तू आमचे बांधावरून म्हैस का घेऊन जातोस असे म्हणत बापूराव लक्ष्मीकांत ठोंबरे यांनी कुऱ्हाडीने हाताच्या कोपऱ्याजवळ मारून दुखापत केली. तर दुसरा भाऊ हरिभाऊ लक्ष्मीकांत ठोंबरे यांनी काठीने मारहाण करीत मुकामार दिला. या दोघा भावांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद बाबुराव चव्हाण यांनी दिल्यावरून बापूराव ठोंबरे, हरिभाऊ ठोंबरे या दोघा भावाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानोबा साठे हे करीत आहेत.