केज दि.३० – केज येथील सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थीनी कु.संजना जगन्नाथ साळवे हीस पुणे ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती बापूसाहेब गोरे यांनी दिली.
पुणे येथील जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व सध्या सोशल मीडियाचे राज्याचे प्रमुख असलेले बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषाताई बापुसाहेब गोरे यांचे मागील दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.स्वर्गीय उषाताई गोरे यांचे पती बापूसाहेब गोरे हे गेली २५ वर्षे पुण्यात पत्रकारिता करीत असून त्यांनी पुणे जिल्ह्य पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविले आहे.सध्या ते पुण्याचे विभागीय सचिव असून सोशल मीडियाचे ते राज्याचे प्रमुख आहेत.समाजसेविका असलेल्या उषाताई गोरे यांच्या सन्मानार्थ उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी पासुन दिला जाणारा हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार केज येथील विद्यार्थीनी कु.संजना जगन्नाथ साळवे हीस देण्यात आला आहे.हा पुरस्कार केज येथील तहसील कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या हस्ते हा पुरस्कार काल दि.३० जुलै २०२१ रोजी कु.संजना साळवे हीस प्रदान करण्यात आला.पुणे येथील समाजसेविका उषाताई गोरे यांच्या सन्मानार्थ समाजसेविका उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी इयत्ता १०वीच्या परिक्षेत केज तालुक्यातून चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी चा प्रथम पुरस्कार हा केज येथील सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थीनी कु. संजना जगन्नाथ साळवे हिस देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११ हजार,सन्मान चिन्ह,शाल व श्रीफळ असे आहे.
केज तालुक्यातील १० वी च्या परीक्षेत पहिल्या गुणवान विद्यार्थिनीला रोख ११ हजार,शाल व स्मृतिचिन्ह तसेच तिचे आई वडील व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे, पत्रकार श्रावणकुमार जाधव, दिपक नाईकवाडे, रामदास तपसे, सरस्वती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घुले, सहशिक्षक श्री.मगर, सदर मुलीचे आईवडील संध्या साळवे व जगन्नाथ साळवे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले तर आभार प्रा सुभाष राऊत यांनी मानले.