Site icon सक्रिय न्यूज

विद्युत डीपीचा शॉक लागल्याने 10 वर्षीय मुलगा जखमी…..!

विद्युत डीपीचा शॉक लागल्याने 10 वर्षीय मुलगा जखमी…..!
केज दि.३० – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कंपाउंड वॉलवर बसवलेल्या डीपीजवळ असलेल्या सीताफळाच्या झाडाला लागलेले सीताफळ तोडत असलेल्या दहा वर्षीय मुलास डीपीच्या तारेचा शॉक लागल्याने तो डीपीजवळ पडला.मात्र हि बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला.
                        शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला केज शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी च्या कंपाउंड वॉल वर बसविण्यात आलेल्या डीपी जवळ असलेल्या सीताफळाच्या झाडाला लागलेली सीताफळ तोडण्यासाठी फुले नगर भागात वास्तव्यास असलेला सचिन पोपट पवार हा दहा वर्षीय मुलगा गेला होता. तो सीताफळ तोडत असताना त्यास उघड्या डीपीतील विजेच्या तारेचा शॉक लागल्याने तो डीपीजवळ खाली पडल्याने त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला. तो बेशुद्ध होऊन डी पी जवळ पडला यावेळी त्याच्या सोबत असलेला दुसरा मुलगा मोठ्याने रडत त्यास काढण्यासाठी कंपाउंड वॉल वर चढू लागला. मात्र डीपी जवळ गॅरेज असलेल्या दिलीप बरुरे, पत्रकार अभय कुलकर्णी यांच्यासह तेथे असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास सदरील बाब आल्याने त्यांनी त्या मुलास ओरडून थांबवले.तर शॉक लागून डीपी जवळ पडलेल्या बेशुद्धावस्थेतील मुलास लाकडी काठीने दूर केले व त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version