Site icon सक्रिय न्यूज

जावयाचा सासुरवाडीत राडा, केज तालुक्यातील घटना…..!

जावयाचा सासुरवाडीत राडा, केज तालुक्यातील घटना…..!
केज दि.३१ – माहेरी असलेल्या पत्नीस सासूने पाठवण्यास नकार दिल्याच्या कारणातून सासू, पत्नी व मेव्हण्याला शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एकावर केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           तालुक्यातील शिरूर घाट येथील रामचंद्र माणिक सांगळे हा दि.30/07/2021 रोजी रात्री 11 वाजता फिर्यादी अभिषेक अश्रुबा बांगर रा. मुंडेवाडी यांच्या घरासमोर गेला व मोठमोठ्याने ओरडून व शिविगाळ करत घराच्या दरवाज्यावर लाथा मारत माहेरी आलेल्या पत्नीला मुलाबाळसह तू आत्ताच माझ्याबरोबर चल असे म्हणाला.परंतु फिर्यादीच्या आईने मी मुलीस आत्ताच पाठवणार नाही असे म्हणताच आरोपीने फिर्यादीचे आईस चापटाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी फिर्यादी हा सोडवण्यास गेला असता त्यास लाथाबुक्क्याने मारहाण करून डावे हाताचे दंडास व उजव्या बाजुचे छातीवर चावुन दुखापत केली.तसेच फिर्यादीचे बहिणीस व मुलाना जिवे मारण्याची धमकी दिली.
            सदरील प्रकरणी रामचंद्र माणिक सांगळे विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ह. श्री. ढाकणे हे करत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version