Site icon सक्रिय न्यूज

मुलीच्या आग्रहास्तव बाप चढला लग्नाच्या बोहल्यावर…..!

मुलीच्या आग्रहास्तव बाप चढला लग्नाच्या बोहल्यावर…..!

अहमदनगर दि.१ – आतापर्यंत आपण अनेक विवाह सोहळे पाहिले असतील. पण अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील 60 वर्षीय आजोबा दुसऱ्यांदा लग्न बेडीत अडकल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या 60व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या परिसरात 60 वर्षीय आजोबांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कुदनर या 60 वर्षीय आजोबांच्या पत्नीचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. दरम्यान, कुदनर यांचा सांभाळ करण्यासाठी घरात कोणीही नसल्याने व मुलीचा विवाह झाल्याने ते घरात एकटेच पडले होते. त्यामुळे उतारवयात सांभाळ करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असावी यासाठी कुदनर आजोबा यांनी 40 वर्षीय महिलेशी विवाह केला आहे. संबंधित लग्न हे एकटेपणामुळे करत असल्याचं कुदनर यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच नात्यातीलच सुमन नावाच्या 40 वर्षीय महिलेशी कुदनर आजोबा मित्र व मुलीच्या आग्रहास्तव विवाहबद्ध झाल्याने या अजब विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडियासह परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

शेअर करा
Exit mobile version