Site icon सक्रिय न्यूज

बैलगाडी बाजूला घे म्हणाल्यावरून एकाचे डोके फोडले…..! 

बैलगाडी बाजूला घे म्हणाल्यावरून एकाचे डोके फोडले…..! 
केज दि.२ – रस्त्यावरून बैलगाडी बाजूला घे म्हणाल्यावरून एकास डोक्यात दगड मारून डोके फोडले. तर पत्नीस शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील नामेवाडी येथे घडली. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         नामेवाडी येथील फुलचंद कोंडीबा वायबसे ( वय ४० ) व त्यांची पत्नी हे दोघे १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. नामेवाडी शिवारातील डेकुळ शेताजवळ रस्त्याने समोरून बैलगाडी आल्याने त्यांनी बैलगाडी चालक इसांबर बाजीराव बायबसे यांना बैलगाडी रस्त्यावरून बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून इसांबर वायबसे यांनी गाडीखाली उतरून दगड उचलून फुलचंद वायबसे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर पायावर ही दगड मारून मुकामार दिला. त्यांची पत्नी सोडविण्यास आली असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद फुलचंद वायबसे यांनी दिल्यावरून इसांबर वायबसे व त्यांची पत्नी रेश्मा वायबसे या दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळू सोनवणे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version