परभणी दि.2 – गेवराईचे तत्कालीन व सध्या सोनपेठ येथील तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांना एका तक्रारकर्त्याकडून 55 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सोमवारी (दि.02) सायंकाळी ताब्यात घेतले असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. एका वाळूचे टिप्पर सोडविण्याकरीता ही लाच मागितल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी मागितलेल्या दीड कोटी रुपयांच्या लाचेचे प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या जिल्ह्यातील आणखी एका अधिकार्याविरुध्द केलेल्या या धाडसी कारवाईने जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आशिषकुमार बिरादार हे सन 2017 साली गेवराई येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.