Site icon सक्रिय न्यूज

बारावीचा निकाल जाहीर, कोकण चा सर्वात जास्त तर औरंगाबाद विभागाचा निकाल कमी…….!

बारावीचा निकाल जाहीर, कोकण चा सर्वात जास्त तर औरंगाबाद विभागाचा निकाल कमी…….!

पुणे दि.3 – महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

यंदा राज्यात 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच 91, 435 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच 1372 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 99.81 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे.

विज्ञान – 99.45 टक्के,

कला – 99.83 टक्के,

वाणिज्य 99.81 टक्के,

एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 99.34 टक्के लागलेला आहे. यावर्षीचा निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला… विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के-यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त… कला मागील वर्षी 82.63 टक्के यावर्षी 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त दिसून येत आहे.

शेअर करा
Exit mobile version