केज दि.३ – जनावरांना तुमच्या मुलाने बांध चारला असे म्हणत एका महिलेस शिवीगाळ करीत डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील सांगवी ( सा. ) येथे घडली. या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगवी ( सा. ) येथील आशाबाई रंजीत भांगे ( वय ३१ ) ह्या महिलेने गावातील गोवर्धन ज्ञानोबा केदार यास तुम्ही आमच्या मुलांना पडीक शेतात जनावरे का चारू देत नाहीत असे विचारले असता तुमच्या मुलाने आमचा बांध चारला असे म्हणत गोवर्धन केदार याने शिवीगाळ केली. तर त्यांची पत्नी केशरबाई गोवर्धन केदार या महिलेने आशाबाई भांगे यांना शिवीगाळ करीत डोक्यात दगड मारून डोके फोडले. पायाच्या गुडघ्यावर ही मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद आशाबाई भांगे यांनी दिल्यावरून गोवर्धन केदार, केशरबाई केदार या दाम्पत्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.