Site icon सक्रिय न्यूज

सर्व शिक्षा अभियानाला मुदतवाढ…….!

सर्व शिक्षा अभियानाला मुदतवाढ…….!

नवी दिल्ली दि.४ – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी दिली. सर्व शिक्षा अभियानासाठी किंमत 2.94 लाख कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलीय. ही योजना 2021 पासून मार्च 2026 पर्यंत लागू असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शिक्षा अभियान 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व शिक्षा अभियान 2.0 वर 2.94 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. 2.94 लाख रुपयांमध्ये केंद्राचा हिस्सा 1.85 लाख कोटी रुपये असेल.

सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 11.6 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा, 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षक कक्षेत येतील. सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील काही वर्षांमध्ये, बाल वाटिका, स्मार्ट वर्गखोल्या, प्रशिक्षित शिक्षकांची टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये व्यवस्था केली जाईल आणि पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि सर्जनशील शिकवण्याच्या पद्धती विकसित केल्या जातील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. सर्व शिक्षा अभियानाच्या विस्तारामध्ये शाळांमध्ये सर्वसमावेशक आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये एक भाग म्हणून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांच्या विकासासाठी लक्ष देण्यात येईल. शिक्षण मंत्री म्हणाले की, या अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्ले स्कूल उभारण्याबरोबरच शैक्षणिकसाहित्य तयार केले जाईल, तसेच स्मार्ट वर्गखोल्यांचीही व्यवस्था केली जाईल.

दरम्यान, सर्व शिक्षा अभियानाची व्याप्ती वाढविताना, विशेष सहाय्याची गरज असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र मानधनाची तरतूद, शिकण्याच्या प्रक्रियेवर देखरेख, शिक्षकांची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण कार्य यावर विशेष लक्ष दिले जाईल, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. सर्व शिक्षा अभियानांअंतर्गत कस्तुरबा गांधी कन्या शाळांची व्याप्ती आणि श्रेणीसुधारणे आणि ‘सर्व’ रिपोर्ट कार्डची प्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत सर्व शिक्षा अभियानाला मुदतवाढ देण्यात येत असल्याचं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

शेअर करा
Exit mobile version