बीड दि.५ – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरिप हंगाम (2020) मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सुमारे 4 लक्ष 32 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टी ने नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र नुकसानभरपाईपोटी फक्त 20 हजार शेतकऱ्यांनाचा पीकविमा नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळावा ,पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्ज वाटप विनाविलंब करावे. आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या बीड-परळी राज्य महामार्गावरील घाटसावळी येथे आज दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दीड तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नुकसान पात्र बाधीत शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे पैसे 15 ऑगस्ट पर्यंत जमा करावेत ,फसवा बीड पीकविमा पॅटर्न रद्द करावा अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना घेराव घालण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला. या आंदोलनाला शिवक्रांती संघटनेचे गणेश बजगुडे, ऍड. प्रेरणा सूर्यवंशी, मनोज पाटील, दत्तप्रसाद सानप यांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.