Site icon सक्रिय न्यूज

सर्वांसाठी आनंदाची बातमी, 15 ऑगस्ट नंतर होणार जोरदार आगमन…..!

सर्वांसाठी आनंदाची बातमी, 15 ऑगस्ट नंतर होणार जोरदार आगमन…..!

मुंबई दि.६ – राज्यात मागील काही दिवसांत काही ठिकाणी तुफान पाऊस झाला, तर काही ठिकाणी त्याने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस राज्यात सर्वदूर होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. इतकंच नाही, तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती; पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. दरडी कोसळतील, अशा ठिकाणच्या नागरिकांनी तातडीने स्थलांतरित व्हावे, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. येत्या आठवड्यात पावसाची ओढ कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आभाळ कोसळले, तर काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला. या ठिकाणी शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. त्यामुळे या सगळ्यातून दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे अशात वरूण राजा पुन्हा शेतकऱ्यांना साथ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version