नाशिक दि.७ – कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी नागरिकांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 22 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले आहेत. मागील काही दिवसांपुर्वी डेल्टा व्हेरियंटचे रूग्ण वाढताना दिसत होते मात्र ती संख्या शून्यावर गेली होती. मात्र अशातच राज्यातील नाशिक जिल्ह्यात 30 रूग्ण आढळले आहेत.
नाशिक जिल्ह्यात एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकूण 155 सँपल तपासणीसाठी पाठवले होते त्यातील 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जण आढळले आहेत तर नाशिक शहरात 2 जण सापडले आहेत. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता.
दरम्यान, नागरिकांनी सावध होत कोरोना हा अजुनही पुर्णपणे संपला नाही याचं भान ठेवावं. कारण कोरोनामुळे कित्येकांची घर उद्ध्वस्त झाली होतीत. त्यामुळे जबाबदार नागरिकाप्रमाणे नियमांचं पालन करत व्हायरसपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं.