बीड दि.७ – जिल्ह्यात वारंवार कारवाया होऊनही अवैध वाळू तस्करी कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाळू चोरीचे प्रकार वाढत असताना विशेष पथकाने धाडसी कारवाई करत चांगला दणका दिला आहे.
दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता गोदावरी नदीपात्रामध्ये चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राक्षस भुवन शिवारामध्ये चोरट्या मार्गाने वाळूचे उत्खनन करून विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर बीड पोलीस विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांच्या पथकाने छापा मारला असता दोन जेसीबी आणि दोन भारत बेंच हायवा यांना जागीच पकडले. यातील तीन वाहन चालक यांना जागीच पकडण्यात आले असून एक वाहन चालक फरार झाला आहे. यामध्ये भादवी 379, 109 प्रमाणे चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत (एक कोटी पाच लाख वीस हजार) 105 20000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.