Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातून २१ वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता…..! 

केज तालुक्यातून २१ वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता…..! 
केज दि.८ – तालुक्यातील मस्साजोग या गावातून २१ वर्षाची तरुणी ही ६ ऑगस्टपासून बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊन मिळून न आल्याने तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी केज पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
        मस्साजोग येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका पदावर कार्यरत असलेल्या सविता दिपक सोनवणे ह्या पती, दोन मुले, दोन मुलीसह वास्तव्यास आहेत. ६ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी दीप्ती दीपक सोनवणे ( वय २१ ) ही शौचाहून घरी आली. त्यानंतर कोणाला काही ही न सांगता घराच्या बाहेरून निघून गेली. त्यानंतर तिचा लहान भाऊ विश्वदिप सोनवणे हा तिच्या मागे – मागे बस्थानकापर्यंत गेला. बसस्थानकावर त्याला दिप्ती ही दिसली. काही वेळाने ती बसस्थानकावर दिसून आली नाही. त्यानंतर नातेवाइकांकडे तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नसून रंग गोरा, उंची साडेपाच फुट आणि अंगावर आकाशी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीस आहे. तरुणीची आई सविता सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक अतिष मोराळे हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version