Site icon सक्रिय न्यूज

मराठवाड्यात डेल्टा व्हेरियंट ची एन्ट्री……!

मराठवाड्यात डेल्टा व्हेरियंट ची एन्ट्री……!
मुंबई दि.९ – राज्यात डेल्टाप्लस रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता ही संख्या 21 वरून 45 वर गेली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 45 रुग्णा पैकी 27 पुरुष आणि 18 स्त्रियांना याची लागण झाली आहे.रत्नागिरी, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे याठिकाणी हे रुग्ण आढळले.  मराठवाड्यात देखील या व्हेरियंट चा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

              दरम्यान लसीकरणाच्या बाबतीत केंद्राने सहकार्य केल्यास अधिक गती वाढवून कोरोनवर नियंत्रण लवकर मिळवणे शक्य असल्याचे सांगत टोपे यांनीअधिक लसी देण्याची केंद्राला पुन्हा एकदा विनंती केली आहे.

शेअर करा
Exit mobile version