Site icon सक्रिय न्यूज

निर्णय झाला…..राज्यातील 5 वी ते 7 वी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश…….!

निर्णय झाला…..राज्यातील 5 वी ते 7 वी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश…….!
मुंबई दि.१० –  दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
       यामध्ये महानगरपालीका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी समिती गठीत केली असून  आयुक्त, महानगरपालीका (अध्यक्ष), वार्ड ऑफीसर, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक हे सदस्य असणार आहेत. तर नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामपंचायत स्तरावर यांच्यासाठीही समिती गठीत होणार असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर मुख्याधिकारी, नगरपरिषद, वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषद / जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) हे सदस्य म्हणून राहणार आहेत.
            दरम्यान शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असून ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे.तर पालकांची संमती आवश्यक असून त्यानंतरच शाळा सुरू होतील.परंतु घाईत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे योग्य नसून यावर सरकारने विचार करण्याची गरज असल्याची भूमिका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मांडली आहे.
शेअर करा
Exit mobile version