Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठीं नवीन नियमावली जाहीर…….!

बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठीं नवीन नियमावली जाहीर…….!
बीड दि.१० – बीड जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या तालुक्यांमध्ये या कार्यालयाचे आदेश 28.07.2021 मधील निर्बंधामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
                  बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात आवश्यक सेवांच्या पुरवठा संबंधित आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वा. पर्यंत असेल. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात सोमवार ते शुक्रवार आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी (सोमवार ते शुक्रवार) सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वा. पर्यंत असेल. शनिवार व रविवार या दिवशी आवश्यक सेवांच्या पुरवठा संबंधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्ण पणे बंद राहतील. वरील तालुक्यांमधील सर्व आस्थापना पैकी जसे की, हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स सेवा, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर इ. आस्थापना धारकांना या कार्यालयाचे आदेश क्र.2021/आरबी डेस्क-1/पोल-1 /कावि फोप्रसंक 144 दिनांक 05.06.2021 मधील नमुद निर्बंध वरील कालावधी मध्ये लागु राहतील. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई तालुक्यांमध्ये सकाळी 10.00 वा. ते दुपारी 04.00 वाजेपर्यंतची आस्थापना सुरु ठेवण्याची सुधारित वेळ लक्षात घेता, दुपारी 04.00 वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणां व्यतिरिक्त (उदा. परगावी प्रवास, वैद्यकीय सेवा इ.) हालचाल व शहरातंर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार नाही. उक्त वेळे व्यतिरिक्त विना कारण घराबाहेर पडल्याचे निर्दशनास आल्यास संबंधिता विरुध्द आपत्ती व्यपस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही अनुसरण्यात येईल. संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगर पालिका / नगर पंचायत, पोलीस निरिक्षक स्थानिक पोलीस स्टेशन, यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदरील आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे पूर्ण करावी. शहरांमधील विशिष्ट ठिकाणी अथवा विशिष्ट गाव / वाडी ठिकाणी मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निर्दशनास आल्यास अशी शहरी भागांमधील ठिकाणे / गावे / वाडी कंटेन्मेंट झोन (Containment Zone) घोषित करण्याबाबतची दक्षता स्थानिक अधिकारी यांनी घ्यावी तसेच (Containment Zone) ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्थानिक कर्मचारी यांनी कार्य करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत स्थळ पाहणी करावी.
              तसेच सद्यस्थितीत जिल्ह्यात कोवीड-19 बाधित असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरण (Home Isolation परवानगी पुर्णतः बंद असल्याने ज्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आढळुन येतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात येईल. बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे नागरिक तसेच विहित कालावधी नंतरही आस्थापना सुरु ठेवणारे व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यात यावी जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पूर्ण होईल. शनिवार व रविवार या दिवसांमध्ये आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता सर्व तहसिलदार यांनी घ्यावी, या करिता कार्यक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, नगर पालिका / नगर पंचायत व गट विकास अधिकारी यांच्या सोबत दररोज आढावा घ्यावा आणि सर्व तहसिलदार यांनी याबाबत सर्व संबंधित विभागासोबत समन्वय ठेवुन कामकाज करावे. दंडात्मक कार्यवाही प्राधान्याने आणि परिणामकारक असावी. निर्बंधाचा कालावधी लक्षात घेता, नियंत्रक अधिकारी यांनी शेती विषयक कामे व पीक कर्ज विषयक कामे बाधित होणार नाहीत याबाबत दक्षता घेवुन विवेकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे सदर आदेशानुसार करण्यात आलेले बदल हे औद्योगिक क्षेत्रास प्रभावित करणार नाहीत. उद्योगांना यापुर्वीच्या वेळोवेळी निर्गमित आदेशांमधील नियम व निबंध पूर्वीप्रमाणे लागू राहतील.
              दरम्यान जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील क्षेत्रीय अधिकारी यांनी देखील सद्यस्थितीत त्यांच्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी, गाफिल न राहता या कार्यालयाचे वेळोवेळी प्रदान करण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. सदरचे आदेश दिनांक 11.08.2021 (सकाळी 07.00 वाजेपासुन) या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत बंधित कार्यक्षेत्रात लागु राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.
शेअर करा
Exit mobile version