मुंबई दि.११ – पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की दिनांक ३०.०७.२०२१ रोजी ह्या कार्यालयातर्फे शुध्दीपत्रक देण्यात आले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या Password व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच Password सर्व उमेदवारांना बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आ आवेदनपत्र उघडू शकणार नाही. तसेच एसईबीसी च्या उमेदवारांना ‘अराखीव (खुला)’ किंवा ‘EWS’ यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतू काही उमेदवारांना त्यांचा Email ID विसरलेला आहे किंवा अन्य कारणास्तव हरविलेला आहे, अशा प्रकारच्या तक्रारी काही उमेदवारांकडून या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पुनःश्च असे कळविण्यात येते की ज्या उमेदवारांचे Email ID असतील / लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर त्यांचा Email update) करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना दिनांक २२/०८/२०२१ चे २४०० वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in ह्या संकेतस्थळावर जाऊन ‘पोलीस कॉर्नर’ ह्या बटनला क्लीक करुन ‘पोलीस भरती २०१९’ येथे क्लीक करावे. संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प दयावा अथवा Email ID / Password बदल करुन घ्यावा असे आवाहन संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई यांनी केले आहे.