केज दि. 12 – ओळखी च्या पुरुषाकडून मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली असून अंबाजोगाई शहर ठाण्यात आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सध्या आरोपी फरार आहे. सदरील महिला ही केज तालुक्यातील शिरपुरा येथील लेक होती.
फिर्यादी धनराज सोपान घुले रा. शिरपूरा (ता. केज) यांची विधवा मुलगी वडवणी येथे वास्तव्यास होती. परंतु दोन महिन्यापूर्वी अंबेजोगाई शहरातील जैन गल्ली येथे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवण्यासाठी किरायाने रूम करून राहत होती. वडवणी येथील बाळू केंगार हा ओळखीचा फायदा घेत सदरील विधवा महिलेस फोनवर व प्रत्यक्ष घरी येऊन लगट साधण्याचा प्रयत्न करायचा. याबाबत सदर महिलेने आणि तिच्या वडीलाने त्याला अनेकदा समजावून सांगितले मात्र बाळू केंगार आपले उद्योग सोडत नव्हता. यातूनच सदर महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बाळू केंगार विरोधात अंबाजोगाई पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.