Site icon सक्रिय न्यूज

चनई परिसरातील वेश्या व्यवसाय बंद करा, रहिवाशांचे अपर पोलीस अधीक्षकांना साकडे……!

चनई परिसरातील वेश्या व्यवसाय बंद करा, रहिवाशांचे अपर पोलीस अधीक्षकांना साकडे……!
अंबाजोगाई दि. १३( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई शहरालगत चनई परिसरातील सह्याद्री नगर या ठिकाणी काही महिला व पुरुष मिळुन संगनमताने वेश्या व्यवसाय चालवित आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची भेट घेऊन केली आहे.
             शहरालगत चनई परिसरातील सह्याद्री नगर परिसरातील  एका घरामध्ये काही महिला व काही पुरुष मिळुन राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालवीत आहेत. याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना होऊ लागला आहे. या परिसरात अनेक घरे असून लहान मुलांसह अनेक कुटुंब राहतात. गेल्या काही महिन्यापासून येथे असणाऱ्या त्या घरासमोर मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच थांबलेली असतात याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो. तर ही आलेली मंडळी ही परिसरातील महिलांकडे कुत्सित नजरेने पाहतात परिणामी या भागातील मुली व महिला यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
                    सदरील परिसरातील असणाऱ्या मंदिराकडे अशा स्थितीमुळे कोणीही फिरकत नाही. एकुणच या परिसरात  राहणाऱ्या लोकांची मोठी कोंडी होऊ लागली आहे. या परिसरातील वातावरण कुलुषित बनले आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या संदर्भात यापूर्वीही शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु त्याची दखल न घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. आता याप्रकरणी कोणती कारवाई होणार या याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
शेअर करा
Exit mobile version