Site icon सक्रिय न्यूज

वर्दीवर नसताना पोलिसांना करता येणार नाही कारवाई…….!

वर्दीवर नसताना पोलिसांना करता येणार नाही कारवाई…….!

मुंबई दि.13 – राज्यातील पोलिसांना कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना यापुढे वर्दीत राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. वर्दीवर नसताना कोणतीही कारवाई करु नये असं, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी खडसावलं आहे.

हा निर्णय राज्यातील वाहतूक पोलिसांना सुध्दा लागू असणार आहे. वाहतूक पोलिसांना वर्दीवर नसताना कोणत्याही गाड्या अडवता येणार नाहीत. काही वेळा पोलीस वर्दीवर नसताना लोकांवर कारवाई करतात. वर्दीवर नसताना तोतया पोलीस अधिकारी अशावेळी फायदा घेवू शकतात. त्यामुळे वर्दीतच पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची मार्च 2021 मध्ये पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पोलीस दलात चांगले निर्णय घेतले. परमबीर सिंग यांच्या जागी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी विशेष पोलिसांच्या पुर्नरचनेचा पहिला निर्णय घेतला होता.

शेअर करा
Exit mobile version