Site icon सक्रिय न्यूज

खाजगी रुग्णालयाचे तातडीने ऑडिट करून माहिती सादर करा……!

खाजगी रुग्णालयाचे तातडीने ऑडिट करून माहिती सादर करा……!
बीड दि.१३ – मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणा मुळे रुग्ण संख्या कमी होत नाही. ग्रामीण व शहरी भागात कडक कारवाई होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
                        जिल्ह्यातील कोरोना लसीकरण परिस्थिती तसेच कृषी, भूसंपादन, महावितरण आदी विषयी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली याप्रसंगी पालकमंत्री श्री. मुंडे बोलत होते. बैठकीसाठी आ. प्रकाशद सोळंके, आ. संदीप क्षीरसागर,  आ. बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थिती होते. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका देशापुढे असून जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण होऊन देखील तिसरी लाट आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटे पेक्षा यामध्ये जास्त रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आहे यासाठी पूर्वतयारी करताना केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजन साठी स्वयंपूर्ण होण्याच्या सूचना दिल्या असून संसर्गाच्या लाटे दरम्यान केंद्राकडून ऑक्सीजन उपलब्ध होऊ शकणार नाही. आपल्या बीड जिल्ह्यात देखील यादृष्टीने सध्या असलेल्या क्षमता वाढविण्यासाठी प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्प तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
            दरम्यान, कोविड उपचारांसाठी ज्या खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले योजना लागू करण्यात आली होती, तेथे मोफत उपचार झाले नसल्यास प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल आणि केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश श्री. मुंडे यांनी दिले. हे ऑडिट तातडीने पूर्ण करून रुग्णालय निहाय लेखी स्वरूपात सादर करावेत असेही ना. मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version