Site icon सक्रिय न्यूज

पाच महिलांकडे सापडले मोठे घबाड…..!

पाच महिलांकडे सापडले मोठे घबाड…..!

औरंगाबाद दि.१४ – पाच महिलांनी हातचलाखी दाखवत बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. मॅनेजरला वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि त्याने समयसूचकता दाखवत कंडक्टरला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत मॅनेजरने तक्रार नोंदवली आणि शेतीच्या बांधावरून पळून जाणाऱ्या महिलांकडे घबाड सापडले. औरंगाबादमध्ये हा थरारक प्रसंग घडला.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन मॅनेजर बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये बसलेल्या पाच महिला प्रवाशांनी हातचलाखी केली आणि त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. ही रक्कम घेऊन या महिला गोळेगाव या गावात उतरल्या, त्यावेळी मॅनेजरच्या हा प्रकार लक्षात आला.मॅनेजरने तात्काळ ही गोष्ट बस वाहकाच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि शेतीच्या बांधावरुन पळून जाणाऱ्या महिलांना गाठले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रक्कम आढळून आली.

दरम्यान, औरंगाबादमधील अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे प्रवासात अत्यंत सतर्क आणि सावध राहणं किती जास्त गरजेचं झालं आहे, हे अधोरेखित आहे. त्याच बरोबर बँक मॅनेजर, बस वाहक, बस चालक आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

शेअर करा
Exit mobile version