Site icon सक्रिय न्यूज

केज नगर पंचायत मध्ये संगणकीकृत कर भरणा प्रणाली कार्यान्वीत……!

केज नगर पंचायत मध्ये संगणकीकृत कर भरणा प्रणाली कार्यान्वीत……!
केज दि.१५ – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन शासनाच्या डिजिटल इंडीया या धोरणाचे अनुषंगाने केज नगर पंचायत कार्यालयात कर विभागा अंतर्गत केज शहरातील सर्व मालमत्ताधारकांना मालमत्ताकर व ईतर करांचा भरणा करणेसाठी संगणकीकृत कर भरणा प्रणाली अर्थात Computerised Tax Payment System चे उद्घाटन केज नगर पंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई  शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  या संगणकीय प्रणालीद्वारे मालमत्ताधारकांना कराचा भरणा केल्यानंतर संगणकीकृत पावती प्राप्त होणार असुन त्यांनंतर संबंधित मालमत्ताधाकांना SMS द्वारे कर भरल्याबाबतची माहीती मोबाईलवर प्राप्त होणार आहे. या प्रणालीमुळे कर विभागातील मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने त्याद्वारे हस्तलिखीत चुका कमी होवुन अचुकता व पारदर्शकता येणार आहे. तसेच या प्रणालीमुळे केज नगर पंचायतीच्या वसुलीचे 100 टक्के उद्यीष्ट पुर्ण होण्यास मदत होणार आहे.
                                     केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी  सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायतचे सुरेश होटे, कर अधिक्षक माधव बोधगीरे व अनिल राउत यांनी कोअर प्राजेक्ट इंजिनिअर ऍन्ड कन्सलटंट अमरावती यांच्या सहकार्याने सदरची प्रणाली विकसीत केली आहे.
                      कार्यक्रमाचे शुभारंभाचे दिवशी सदर प्रणालीद्वारे 5 मालमत्ताधारकांचा कर भरणा करुन घेण्यात आला. यामध्ये रु. 19270/- एवडी वसुली करून संगणकीकृत कर पावत्या मा. प्रशासक यांचे हस्ते वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव बोधगीरे कर अधिक्षक यांनी केले. यावेळी केज नगर पंचायतीचे स्वच्छता निरीक्षक असद खतीब, रचना सहाय्यक ज्ञानेश्वर पोटे, नगर अभियंता शुभम हासबे व जी.के. शिरसाठ तसेच पाणीपुरवठा अभियंता  राजकुमार काळे, प्रशासकिय अधिकारी सय्यद अनवर व श्री आयुब पठाण, रफिक कुरेशी, मिथुन गुंड, भिमराव मस्के, सय्यद अतिक, अजिम ईनामदार, कोअर प्रोजेक्टचे मॅनेजर मंगेश शेटे,  चेतन मार्बते व ईतर कर्मचारी हजर होते.
शेअर करा
Exit mobile version