Site icon सक्रिय न्यूज

कार्यकर्त्यांवर का भडकल्या पंकजा मुंडे……?

कार्यकर्त्यांवर का भडकल्या पंकजा मुंडे……?

परळी दि.१६ – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड  यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.  अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. भागवत कराड यांच्यासमोर राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा संतापल्या. अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीच आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.सकाळी 9 च्या आसपास केंद्रीय मंत्री भागवत कराड जन आशीर्वाद यात्रेसाठी परळीत दाखल झाले. साडे नऊच्या आसपास ते पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

दरम्यान, पंकजा यांच्या घरासमोर गोपीनाथ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावरुन पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये रोष कायम असल्याचं दिसून येत आहे.

शेअर करा
Exit mobile version