Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत लाक्षणिक उपोषण संपन्न…….! 

केज तालुक्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत लाक्षणिक उपोषण संपन्न…….! 
केज दि.१६ – स्वातंत्र्यदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने होळ, बनसारोळा, युसुफवडगाव जि. प.गट पं.स.गणातील गावांत ध्वजारोहना नंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
                 वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने प्रचंड मोठी दुरावस्था असलेल्या रस्त्यांना नव्याने मंजुरी द्यावी, बोगस बिले उचलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आदि मागण्या उपोषकर्ते शेतकरी करत आहेत. यामध्ये बनसारोळा, युसूफवडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावात रस्ताप्रश्नी जनजागृती झाली असून सदर प्रश्न मार्गी लागला नाही तर भविष्यात मोठे आंदोलन होऊ शकते. जवळबन ,बोरीसावरगाव, कानडीबदन, बनसारोळा, लाडेगाव, दीपेवडगाव, आवसगाव, सौंदाणा, सोमनाथ बोरगाव,  इस्थळ, पैठण, आनंदगाव (सा.) सोनिजवळा, भाटुंबा गावांत नागरिकांनी लाक्षणिक उपोषण करून रस्त्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप करपे यांच्यासह प्रमोद पांचाळ,अशोक साखरे, गोविंद करपे,चंद्रकांत अंबाड, सुग्रीव करपे, शिवाजी भाकरे, अविनाश करपे, संदिप करपे, शिवाजी शिंपले, जयंत साखरे, श्रीकिशन साखरे, राकेश गाडेकर,लक्ष्मण काकडे, नवनाथ काकडे, घनश्याम साखरे, अविनाश साखरे, नितेश साखरे, सुनिल शिनगारे, अक्षय भिसे, दत्ता शिंदे, हनुमंत साने, अशोक भोगजकर, विनोद धपाटे, बप्पा चौधरी, प्रकाश गिरी, रमेश गोरे,  भानुदास  धायगुडे, महादेव  वाघमारे , लक्ष्मण, वसंत सोमवंशी, गोरेमाळी, कोंडीबा गोरे  आदींनी सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
शेअर करा
Exit mobile version