केज दि.१८ – तालुक्यातील नाव्होली येथील २९ वर्षीय कल्पना दत्तात्रय झाडे विवाहित महीलेने सासरच्या जाचाला वैतागून राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडल्याने बुधवारी सकाळी मयत महीलेच्या नातेवाईकांनी प्रेत पोलीस ठाण्यात आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी आरोपी अटक करण्याचे आश्वासन देत मयत महीलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन आरोपी दत्तात्रय झाडे पती, माणीक झाडे सासरा,गोरख झाडे दिर या तिघा विरोधात गुन्हा दाखल होताच केज पोलिसांनी तिन्हीही आरोपींना अटक केले आहे.
केज तालुक्यातील पिसेगांव येथील सायसराव लांडगे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह २०१४ ला नाव्होली येथील माणिक लांडगे यांचा मुलगा दत्तात्रय उर्फ भुजंग झाडे याच्या सोबत रिती रिवाजाप्रमाणे करून दिला होता.कल्पना हिला एक चार वर्षाचा मुलगा व एक पाच महीण्याची मुलगी असे दोन अपत्य आहेत. पती, सासरा व दिर हे सतत कल्पनाला शेतात बोअर घेण्यासाठी नविन मोटारसायकल घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन ये म्हणून सतत मारहाण करुन मानसिक व शारीरिक त्रास देत घराबाहेर काढत होते.
सासरी सतत होणाऱ्या जाचाची कल्पना आपल्या आई वडील व भावाला दिली होती.तेव्हा माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांची समजूत काढली होती.परंतु सासरी होणारा जाच काही कमी झाला नाही म्हणून अखेर कल्पनाने सासरच्या सततच्या जाचाला वैतागून मंगळवार १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री आपल्या घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील घटना माहेरच्य लोकांना माहीत होताच त्यांनी नाव्होली येथे धाव घेतली व प्रेताची पाहणी केली असता घातपाताचा संशय व्यक्त करत मयताचे प्रेत एका जिप मध्ये टाकून केज पोलीस ठाणे गाठले व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, मयताचा भाऊ अंकुश सायसराव लांडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा र.जि.न.३९६ कलम ३०६,४९८ अ,३२३,३४ नुसार आरोपी दत्तात्रय उर्फ भुजंग माणिक झाडे (पती), माणिक विठ्ठल झाडे (सासरा), गोरख उर्फ पोपट माणिक झाडे सर्व रा.नाव्होली ता.केज यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच केज पोलीस ठाण्याचा नविनच पदभार घेतलेले ए.पी.वाघमोडे यांनी तपास चक्रे फिरवून पती दत्तात्रय झाडे हा मस्साजोग येथून पळून जाण्यच्या मार्गात असतानाच जमादार अमोल गायकवाड यांनी ताब्यात घेतला व दिर पोपट हा काळेगाव घाट येथून तर सासरा हा नाव्होली येथून ताब्यात घेतला. तीनही आरोपी ताब्यात घेण्यासाठी दादासाहेब सिद्दे, श्रीराम काळे, अशोक नामदास, मुकुंद ढाकणे, शिवाजी सानप यांनी आरोपी ताब्यात घेण्यासाठी परीश्रम घेतले. घटनास्थळी ए.पी.वाघमोडे यांनी घटनास्थळीभेट दिली आहे.