Site icon सक्रिय न्यूज

नगरपालिका निवडणुक, 2011 च्या लोकसंख्येनुसार होणार प्रभाग रचना….!

नगरपालिका निवडणुक, 2011 च्या लोकसंख्येनुसार होणार प्रभाग रचना….!
बीड दि. २० – राज्यभरात कोरोनाचे प्रमाण काहीसे कमी होऊ लागल्या नंतर आता महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मुदत संपणाऱ्या नगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकान्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यातील ६ नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना करावयाची आहे, तर ५ नगरपंचायतीची प्रभाग रचना झालेली आहे. राज्यात आता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये मुदत पूर्ण होत असलेल्या नगरपालिकांच्या संदर्भान आता तातडीने प्रभाग रचनेची प्ररिया हाती घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रक्रिया तातडीने राबवून मान्यतेसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये एक सदस्सीय प्रभाग पद्धत सुरु केली आहे. त्यामुळे आता नव्याने सदस्य संख्या निश्चित करावी लागणार आहे. यासाठी २०११ ची लोकसंख्या प्रमाण मानवी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अगोदर शहराची सदस्य संख्या निश्चित करून मग लोकसंख्येच्या सरासरीच्या प्रमाणात तसे प्रभाग करावयाचे आहेत.

                      प्रभाग रचना करताना नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर होऊ नये यासाठी यावेळी अधिकाऱ्यांना गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. अगोदर गुगल अर्थ हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून नदी, पूल, रस्ते अशा सीमा निश्चित कराव्या लागणार आहेत. 

                      प्रत्येक नगरपालिकेची सदस्य संख्या ठरविण्याचे सूत्र महाराष्ट्र नगर पालिका, नगर पंचायत अधिनियम १९६५ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिनियमातील कलम ९ आणि १० अनुसार सदस्यसंख्या ठरवायची आहे. यात ‘अ’ वर्ग नगरपालिकेची किमान ३८ सदस्य असून त्या शहरातील १ लखनंतरच्या प्रत्येक ८ हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य अधिकच असणार आहे. तर ‘ब’ वर्ग नगरपालिकेत किमान सदस्यसंख्या २३ इतकी असून ४० हजारापेक्षा अधिकच्या लोकसंख्येच्या बाबतीत प्रत्येक ५ हजाराची १ सदस्य अधिकच असणार आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत किमान १७ सदस्य आणि २५ पेक्षा अधिकच्या लोकसंख्येसाठी प्रत्येक तीन हजाराला अधिकच १ सदस्य असे सूत्र असणार आहे. त्यामुळे आता काही नगरपालिकांमधील सदस्यसंख्या कमी होऊ शकते असा अंदाज आहे.
शेअर करा
Exit mobile version