Site icon सक्रिय न्यूज

डोक्यात कांही विचार सुरू होते, पण आता आत्महत्या करणार नाही……!

डोक्यात कांही विचार सुरू होते, पण आता आत्महत्या करणार नाही……!

अहमदनगर दि.२२ – राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सुसाईट ऑडिओ क्लिप प्रकरणी अहमदनगर पोलीस विभागाने नवी माहिती दिलीय. अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात आलीये. यानंतर तहसीलदार देवरे यांनी मी आत्महत्या करणार नाही अशी लेखी हमी अहमदनगर पोलीस प्रशासनाला दिलीय. उपविभागीय अधिकारी प्रांजल सोनवणे यांनी देवरे यांचं समुपदेशन केलंय, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलीय.

महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. याबाबत त्यांनी ऑडिओ क्लिप जारी करत आत्महत्येचाही इशारा दिला होता. मात्र, आता त्यांनी काही विचार सुरू होते तेव्हा ते बोलले असं सांगत आत्महत्या करणार नाही, असं आश्वासन अहमदनगरल जिल्हा पोलीस प्रशासनाला दिलंय. पोलिसांनी देवरे यांची चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याचं म्हटलंय. पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, “पोलीस निरिक्षकांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. तेव्हाही त्यांनी मी असं काहीही करणार नाही असं नमूद केलंय. आज (21 ऑगस्ट) पुन्हा आमच्या महिला डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांनी चर्चा केली. यात देवरे यांनी मी कार्यालयीन काम करतेय, मी असं काहीही करणार नसल्याचं सांगितलंय. कधीतरी विचारात असं बोललं गेलं होतं, पण आता असा कोणताही विचार माझ्या डोक्यात नाही, असं लेखी आश्वासन देवरे यांनी दिलंय.”

दरम्यान, तहसीलदार देवरे यांचं असंही म्हणणं आहे की जिल्हा प्रशासन, पोलिसांनी योग्य ते सहकार्य केलंय आणि त्या याबाबत समाधानी असल्याचंही मनोज पाटील यांनी सांगितलं.

शेअर करा
Exit mobile version