गेवराई दि. २३ – आजही मातंग समाजाची अवस्था बिकट आहे. गावकुसाबाहेर राहणारा समाज हा आज्ञानी प्रत्येक वर्षी मातंग समाजाचे लोक उसतोडणी साठी जातात व्यसानापाई तरूणाई बिघडत चाललेली असल्यामुळे मातंग समाजाने आपला उद्धार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत होऊन दारिद्र आणि गूलामगिरीची साखळी तोडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे असे प्रतिपादन डीपीआय चे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यातील मिरकाळा याठिकाणी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जंयती निमित्त आयोजित केलेल्या प्रबोधन सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सरपंच पाडुरंग मुंडे , जि प सदस्य पाडुरंग थडगे , रंजनीकांत सुतार , अॅड सोमेश्वर कारके , सय्यद माजेदभाई , सुभाष लोनके , सुनिल पाटाळे , फकिरा हातागळे , अॅड सुरेश ढाकणे , कुभार ढाकणे यांची उपस्थिती होती .तत्पुर्वी याठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची शाखेची स्थापना करण्यात आली.
पुढे बोलताना ते म्हणाले की , तमाम महाराष्ट्रात मातंग समाज आजही गुलामगिरीत आहे. सोलापुर जिल्ह्यातील माळसिरस या गावात मातंग समाजातील व्यक्तीचा अंत्यविधी करू दिला नाही म्हणून संतापलेल्या समाजाने ग्रामपंचायत कार्यलयासमोर अंत्यविधी केला. आजही आपण गुलाम आहोत. प्रत्येक समाजातील व्यक्तीनां राजकिय पार्श्वभुमी आहे केवळ मातंग समाजाला साधा एक नेता देखील नाही ही शोकांतीका आहे. गुलामगिरीच्या चिखलातून उठा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा तूम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. अण्णाभाऊंनी देखील हेच सांगितले आहे जोपर्यंत तुम्ही व्यसन सोडनार नाहीत तसेच गावातील गुलामगिरीची साखळी तोडणार नाहीत तोपर्यंत तुमचा उद्धार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजय सुतार , सचिन धुरंधरे , मदन हातागळे , भगवान घोडे , अमोल सुतार , अस्तिक बाबर , बाजिराव बाबर , राम बाबर , सतिष बाबर , गणेश बाबर , मधुकर बाबर , सुरेश बाबर , साहेबराव बाबर , तुकाराम बाबर , नांमदेव बाबर , विश्वनाथ बाबर , जालिंदर बाबर , मनोज बाबर ,परमेश्वर बाबर , बालाजी बाबर , नितीन बाबर , गणेश बाबर , हिरामन बाबर , नानेश्वर रोकडे , नानेश्वर चांदणे , विनोद बाबर , गिन्याननदेव बाबर , अमोल कारके , आकाश सुतार , गणेश सुतार , त्रिबंक लोंढे , किशोर भोले , बाबा कापसे , सुभम धुताडमल , यांच्यासह अंसख्य समाज बांधव उपस्थित होते .