केज दि.२३ – तालुक्यातील बरड ते शिरूर घाट रस्ता दुरुस्त करून नव्याने तयार करावा या मागणीसाठी मनसे मार्फत अंबळाचा बरड या ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
सारुळ, सारणी, मुंडेवाडी,
नारेवाडी, धोत्रा, शिरूर, हंगेवाडी, आगेवाडी आदींसह अनेक गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. परंतु प्रशासन व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अनेक गावच्या नागरिकांना हा रस्ता चांगला नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.धोत्रा या गावाला आज पर्यंत रस्ता झाला नाही हा रस्ता झाला तर धोत्रा गावातील नागरिकांच्या रस्ताचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल व बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्याला जोडणारा व व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण रस्ता असल्याने या रस्त्याच्या दुरुस्ती साठी मनसे मार्फत अंबळाचा बरड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुढील एक ते दोन महिन्यात या रस्त्याचे काम चालू करू असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अतुल मुंडे यांनी दिल्या नंतर रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.यावेळी मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,मनसे शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष बाबुराव ढाकणे,मनसे चे तालुका सचिव गोरख तोगे,मनसे चे राज घोळवे,प्रभाकर ढाकणे, गोविंद ढाकणे,गोविंद हाके,श्रीकांत वाघमोडे,गोपाळ हाके,अंकुश ठोंबरे,बालाजी गीते,बापूराव गीते, महादेव मुंडे,प्रदीप मुंडे अशोक तोगे,हनुमंत मुंडे,मनसे चे संतोष सिरसट,आदींसह मनसे चे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.