Site icon सक्रिय न्यूज

पैशाच्या वादातून जन्मदात्या बापाचा खून,बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना…..!

पैशाच्या वादातून जन्मदात्या बापाचा खून,बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना…..!
पाटोदा दि. 25 – दारुच्या नशेत पैशाच्या वादातून सुरु झालेल्या भांडणात लेकानेच कुऱ्हाडीचे घाव घालून बापाचा खून केल्याचा प्रकार तालुक्यातील पारनेर येथे सोमवारी घडला. दरम्यान घटना घडल्यानंतर पोरांच्या अडचणी होऊ नयेत म्हणून भावकिने परस्पर अंत्यविधीही उरकला. मात्र एका निनावी फोनने पोलीसांना या घटनेची माहिती मिळाली. आणि दुसऱ्या दिवशी पोलीसांनी मयताच्या दोन मुलांसह इतर नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
              पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील महादेव औटे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा योगेश ( वय ३५) यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाले. त्यावेळी योगेश नशेत होता असे सांगितले जाते. त्या नशेतच योगेशने महादेव यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. यात महादेव औटे यांचा जागीच मृत्यु झाला. घटना घडल्यानंतर आता योगेशवर गुन्हे दाखल होतील म्हणून भावकीतील लोकांनी एकत्र येऊन या खूनाची चर्चा न करताच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला आणि सायंकाळी अंत्यविधी उरकला देखील. मात्र मंगळवारी अज्ञात व्यक्तीने पोलीसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसानी तपासाची चक्रे वेगाने फिरवत योगेश औटे, गणेश औटे, विष्णु औटे, वाल्मिक औटे आणि परमेश्वर औटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पोलीस हवलदार आदिनाथ तांदळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version