केज दि.25 – साळेगाव ता. केज येथील माथेफिरूने पाडलेल्या बस स्टँडचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे आणि त्या संबंधी इतर मागण्यासाठी आज साळेगावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी व ग्रामस्थ उपोषणाला आहेत.
२३ मे रोजी साळेगाव ता. केज येथील बस स्टँड अज्ञान माथेफिरूने पाडले. त्यामुळे प्रवाशांची व महिला, विद्यार्थिनी यांची खूप अडचण होत आहे. याची दखल घेत साळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गौतम बचुटे, ओमप्रकाश मुळे, शिवसेनेचे ज्योतिकांत कळसकर, ज्योतिराम बचुटे, सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे व माजी उपसरपंच श्रीमंत गित्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ हे आज दि.२५ ऑगस्ट रोजी साळेगाव येथील शिवाजी चौकातील पाडलेल्या बस स्टँडच्या जागेवर आमरण उपोषण करत आहेत.
दरम्यान या अलिपाशा रसूल सय्यद यांनीही एक निवेदन दिले असून त्यांनी म्हटले आहे, की सदर बस स्टँडची जागा ही त्यांच्या मालकीची असून ती हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे.