बीड दि.26 – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी बीड जि.प. चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय ला बळकटी मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला अखेर आज पूर्णविराम मिळाला असून बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून माजी मंत्री अशोक पाटील व रजनी ताई पाटील यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत. धडाडती तोफ म्हणून परिचित असलेले एक सर्वसमावेशक व जनतेत राहून सदैव काम करणारा जिल्हा अध्यक्ष पक्षाला मिळाल्याने जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य वाढणार व कार्यकर्त्यांना ही बळ मिळणार आहे.
राजेसाहेब देशमुख यांच्या निवडीचे जिल्हाभरात स्वागत होत असून जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये पाटील कुटुंबियांचे प्राबल्य पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजीमंत्री अशोकराव पाटील, मा.खासदार रजनी ताई पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, कृषी विद्यापीठाचे संचालक राहुल सोनवणे यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.