Site icon सक्रिय न्यूज

महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री ईडी च्या रडारवर……!

महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री ईडी च्या रडारवर……!

मुंबई दि.२९ – परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस  जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला  सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

शेअर करा
Exit mobile version