Site icon सक्रिय न्यूज

सरकारी नौकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…….!

सरकारी नौकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…….!

नवी दिल्ली दि.30 – भारतीय सैन्याच्या एएससीच्या विविध सेंटरमध्ये 400 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एएससी सेंटर नॉर्थ, एएससी सेंटर साऊथ मध्ये सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर, क्लिनर, कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, सफाईवाला या पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन घेऊन तो भरुन पाठवू शकतात.

                            एएससी सेंटर नॉर्थ मध्ये सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर 115, क्लिनर  67, कुक 15 सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03 तर एएससी सेंटर साऊथ मध्ये लेबर 193, सफाईवाला 07 या पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. भारतीय सैन्य दलाच्य एएससी भरती प्रक्रियेद्वारे 400 पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्या जाहिरातीनुसार सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी निश्चित करण्यात आली आहे. पदनिहाय अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर पदासाठी उमदेवाराकडं अवजड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. तर, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर पदासाठी कॅटरिगं प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे.तर एएससी नॉर्थ आणि साऊथ येथील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची भारतात कुठेही नेमणूक केली जाणार आहे. तर, अर्ज जमा करण्यासाठी उमेदवारांनी शुल्क जमा कऱण्याची गरज नाही.

इच्छुक उमेदवार एएससी नॉर्थ साठी  द प्रिसायडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड, सीएक्यू, एससी सेंटर (नॉर्थ), 1 एटीसी, अग्रम पोस्ट, बंगळुरु, 07 तर एएससी साऊथसाठी  द प्रिसायडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड, सीएक्यू, एससी सेंटर (साऊथ), 2 एटीसी, अग्रम पोस्ट, बंगळुरु, 07 येथे अर्ज करू शकतात. सैन्यदलाच्या वतीनं विहित करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये हस्तलिखित किंवा कोऱ्या कागदावर अर्ज टाईप करुन पाठवता येईल. पोस्टल स्टॅम्प आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 17 सप्टेंबरपूर्वी पोहोचेल, अशा पद्धतीनं पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

तसेच न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.

दरम्यान, न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शेअर करा
Exit mobile version