केज दि.३० – बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या कर्णाधरपदी ज्योतिराम घुले यांची निवड झाल्याबद्दल बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
केज तालुक्यातील केळगाव येथे श्रीसंत भगवान बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात डोणगाव येथील ज्योतिराम घुले यांची हैद्राबाद येथे १२ सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्या होत असलेल्या एक दिवसीय, कसोटी व २० – २० क्रिकेट सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल खा. प्रीतम मुंडे यांनी सत्कार केला. यावेळी माजी आमदार केशव आंधळे, पंचायत समितीचे सभापती विष्णू घुले, जि. प. सदस्य संतोष हंगे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, भाजपचे जेष्ठ नेते रमाकांत मुंडे, माजी प. स. सदस्य वसंत केदार, डॉ. वासुदेव नेरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, मुरलीधर ढाकणे, दत्ता धस, पंजाब देशमुख, संभाजी गायकवाड, धनंजय घोळवे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.