मुंबई दि.१ – शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें दरम्यान झालेला वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे.
नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षानंतर शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांचे घर आणि सामना कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राऊत यांच्या घरीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने घराला छावणीचं स्वरुप आलं आहे.डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी कदम यांनी राऊत यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. तसेच कदम यांनी राऊत यांना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, राणे-राऊत वादा दरम्यान निलेश राणे यांनी दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याची दिली होती धमकी. त्यामुळे राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्याही सुरक्षेत करण्यात येणार आहे. झोन-7 चे डीसीपी प्रशांत कदम आणि सुनील राऊत यांच्यात सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक सुरू असून त्यांची सुरक्षाही वाढवली जाणार आहे.