Site icon सक्रिय न्यूज

आईवर विळ्याने वार करून मुलाने केली आत्महत्या……!

आईवर विळ्याने वार करून मुलाने केली आत्महत्या……!
माजलगाव दि.१ – घरात झालेल्या कुरबुरीतून सख्या आईवर विळ्याने वार करून घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील माली पारगाव येथे घडली असून जखमी आईवर उपचार सुरु आहेत.
                          माली पारगाव येथील पारुबाई मचिंद्र कदम ५० व त्यांचा मुलगा बापू मचिंद्र कदम यांच्यात घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत. बुधवार रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या माय लेकरात काही कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी चिडलेल्या मुलाने विळा घेऊन आई वर वार केला. यात पारुबाई यांच्या मानेवर  विळा लागून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांना प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर मार लागल्याने घाबरून जाऊन त्याने शेतात जाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सदरील घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version