केज दि.२ – केज अंबाजोगाई रोडवरील होळ नजीक एका अँबुलन्स ने तरुणास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२) रोजी सकाळी घडली आहे.
धारूर तालुक्यातील कारी येथील संतोष रामभाऊ मुजमुले (वय २७) हा तरुण होळ येथे मावशीकडे आला होता. सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका (A P 27 W 5088) रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.