Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावर लढणार – राजेसाहेब देशमुख……! 

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावर लढणार – राजेसाहेब देशमुख……! 
बीड दि.४ –  काँग्रेस पक्ष ही विचारधारा आहे, कोणा एकाची प्रॉपर्टी नाही. यापुढे बीड जिल्ह्यातील काँग्रेस सर्वांनी विचारात घ्यावी अशी काँग्रेस असेल. कार्यकर्त्यांनी आगामी सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करा, आता काम करणारांनाच संधी मिळेल. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढनार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पहिल्याच बैठकीत राजेसाहेब देशमुख यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दिला.
                        बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी राजेसाहेब देशमुख यांची मागच्या आठवड्यात निवड झाली. त्यांनी शनिवारी दि.४ रोजी अधिकृतपणे पक्ष अध्यक्ष पदाचा पदभार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यानाच्या साक्षीने स्वीकारला. यावेळी त्यांनी परळी पासून अंबाजोगाई, केज, नेकनूर या मार्गाने मोटार रॅली काढून बीड मध्ये प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले व नंतर महिला कॉलेज बीड येथे आयोजित बैठकीत पदभार स्वीकारला.
                 यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना कामाला लागा, येणारा काळ काँग्रेसचा आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडुका पक्ष स्वबळावर लढणार आहे आणि काम करणारानाच पक्ष संधी देईल. त्यामुळे काम करा केवळ चमकोगिरी करणारांनी आपल्याला पद मिळेल ही अपेक्षा ठेवू नका अशा जोशपूर्ण शब्दांत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तर निवड केल्याबदल पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, नाना पटोले, रजनीताई पाटील या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
            यावेळी काँग्रेसचे युवा नेते आदित्य पाटील यांनी देखील जिल्हात आता आम्ही सर्वजण गावा गावात पोहचणार आहोत. याच महिन्यात हा कार्यक्रम आखला जाईल. अनेक तरुण, तरुणी, महिला काँग्रेस मध्ये काम करण्यास तयार आहेत त्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे आता काँग्रेस कोण्या एका बंगल्यावरून किंवा एका गल्लीतून चालणार नाही. त्यामुळे आगामी काळात नविन जुने सर्व कार्यकर्त्याचा मेळ घालून पक्ष काम करील व राजेसाहेब देशमुख यांच्यासारखा निडर जिल्हाध्यक्ष नेत्यांनी आपल्याला दिला असून याचा मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचे आदित्य पाटील यांनी सांगितले. यावेळी राहुल सोनवणे, ऍड. माधव जाधव, नवनाथ थोटे, ऍड. अनिल मुंडे यांचेही भाषणे झाली. त्याचबरोबर जिल्ह्यातून जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
            या बैठकीला काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदित्य पाटील, किसान सेलचे मराठवाडा अध्यक्ष ऍड.माधव जाधव, नवनियुक्त प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड अनिल मुंडे, राहुल सोनवणे, मिनाक्षी पांडूळे, जुबेर चाऊस, हनुमंत मोरे, किरण पाटील, नवनाथ  थोटे, बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, एनएसयुआय चे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बहादूर भाई, ऍड.कृष्णा पंडित यांच्यासह सर्व तालुक्यातील काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय चे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी मोठय संख्येने हजर होते. या बैठकीचे सूत्रसंचालन प्रविणकुमार शेप यांनी तर आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे यांनी मानले.
——————————-
अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश…
               बैठक सुरू होऊन राजेसाहेब देशमुख यांनी पदभार घेताच जिल्ह्यातील अनेकांचे यावेळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाले. यामध्ये परळी तालुक्यातील शरद रोडे, किरण हनवते, भागवत गायकवाड, सागर कांबळे, धनराज रायभोळे, सत्यजित रोडे, अतुल व्हावळे, सागर कांबळे, संदिप गोदाम, मनोज हितकर, लक्ष्मण शिंदे, संतोष बिगणे, विश्वजित गंडले, विजय गोदाम तसेच चौसाळा येथील राष्ट्रीय छावा शेतकरी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अशोक जोगदंड, बिभीषण रसाळ यांचा यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.
—————————–
हक्काच्या कमिट्या कार्यकर्त्यांना मिळणार !
         यावेळी बोलताना ऍड माधव जाधव यांनी म्हटले की आघाडी सरकारमध्ये जो फार्मूला ठरला आहे त्यानुसारच सर्वत्र जिल्ह्यातील कमिट्या होतील त्यामुळे आता पालकमंत्री यांनी प्रत्येक तालुक्यातील कमिट्या करताना काँग्रेस पक्षाला व पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना विश्वासात घेऊनच कमिट्या कराव्यात जेणे करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल.
—————————–
शेअर करा
Exit mobile version