वडवणी दि.६ – तालुक्यातील पिंपरखेड येथील बंधाऱ्यात बुडून तिघे बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (दि.६) सकाळी घडली आहे. यातील एकाचा मृतदेह दुपारी २ वाजता आढळून आला असून या घटनेने वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी,नाले,बंधारे पूर्ण भरून वाहू लागले आहेत. यातच वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील बंधाऱ्यात बाप-लेक आणि भाचा असे तिघे वाहून गेले. यातील मधुकर रोहिदास खळगे (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर त्यांचा मुलगा अजय मधुकर खळगे (वय-२३) आणि भाचा अजय उजगरे (वय २१) हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.