Site icon सक्रिय न्यूज

जबरी चोरी करणारे आरोपी 24 तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…….!

जबरी चोरी करणारे आरोपी 24 तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…….!
बीड दि.6 – बीड बायपास रोडवर केजच्या व्यापाऱ्याला लुटून पुण्याकडे पळ काढणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत जेरबंद केले आहे.
                     दिनांक 04/09/2021 रोजी सायंकाळी 6 वा. चे सुमारास अनिरुध्द संभाजी मुळे रा. कानडी रोड, केज जि. बीड हे जालना जिल्हयातून मिल्क केक विक्री करुन परत येत असतांना बीड बायपास रोडवर एका स्विफ्ट कारने ओव्हरटेक करुन मुळे यांच्या गाडीला आडवी लावून त्यांचेकडील नगदी 1,95,000/- रु. असलेली बॅग घेवून पळून गेले होते. सदर प्रकरणी पो.स्टे. बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 231/2021 कलम 341,392,34 भा.दं.वि. प्रमाणे दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून पोलीस अधीक्षक , बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
                  त्यावरुन पो. नि. स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक घटनास्थळी भेट देवून आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा धनराज विश्वनाथ ठोंबरे रा. सारणी ता. केज जि. बीड याने त्याचे साथीदारासह केला आहे व तो पुण्याचे दिशेने गेला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सदर आरोपीस शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे येथून त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली. त्याने व त्याचे साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन त्याचे साथीदार चांगदेव लक्ष्मण भांगे, शरद राजेंद्र घोळवे दोन्ही रा. सारणी सांगवी ता.केज जि. बीड, जुबेर आयुब आतार रा. मल्टन ता. शिरुर जि. पुणे, तुषार संपत गुंजाळ रा.राहू ता. दौंड जि. पुणे यांना शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडून गुन्हयात वापरलेली स्विफ्ट कार क्र. MH-12-SF-4167 व (04) मोबाईल हॅन्डसेट एकूण किंमत 5,26,000 /- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
      सदरील प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 231/2021 कलम 341, 392,34 भादवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून स्था.गु.शा.चे पथक पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version