Site icon सक्रिय न्यूज

केज गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन……!

केज गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन……!
केज दि.८ –  साक्षर भारत अभियान अंतर्गत सन 2012 ते सन 2018 या कालावधीत प्रेरक /प्रेरिकांच्या माध्यमातुन साक्षर भारत अभियान राबवण्यात आले या कालावधीत अत्यंत अल्प अशा मानधन तत्वावर उच्च शिक्षीत प्रेरक/प्रेरिका यांनी प्रमाणिक पणे कार्य केले प्रति महिना 2000 रु. अल्प मानधन असुन देखील ते पुर्णपणे शासनाने दिलेले नाही. सरासरी 6 वर्षाच्या कालावधीतील अंदाजे 44000/- हजार रुपये एवढे एका प्रेरकाचे मानधन अद्याप मिळाले नाही. याचा निषेध म्हणून तालुक्यातील प्रेरकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेतले.
               सदरील प्रेरकांनी भविष्याचा विचार करुन साक्षर भारत अभियानानंतर नौकरीच्या अशेने मानधनाचा विचार न करता प्रमाणिकपणे काम केले.परंतु काम सरो वैदय मरो या शासनाच्या भूमिकेमुळे तालुक्या सह राज्यातील हजारो प्रेरकांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. 8 सप्टेंबर पासुन प्रस्तावित पढना लिखना अभियानात प्रेरकांना वगळुन सेवानिवृत्त शिक्षकांना हे काम देण्यात आले आहे. ज्यांना की, शासनाचे पेन्शन स्वरुपात हजारो रुपये मिळतात. त्यांनाच परत योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांना गरज आहे, बेरोजगार आहेत, तब्बल 6 वर्षाचा अनुभव असुन देखील त्यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.
                   काम सरो वैदय मरो या शासनाच्या आडमुठे पणाच्या भूमिके मुळे हजारो सुशिक्षीत बेरोजगार झाले आहेत. तरी संभाव्य पढना लिखना अभियानात प्रामुख्याने प्रेरक प्रेरिकाचा समावेश करण्यात यावा, थकित मानधन तात्काळ आदा करण्यात यावे, अनुभवाचा विचार करुन प्रेरकांना अंशकालीनचा दर्जा देण्यात यावा. मागण्यांचा माय बाप सरकारने बेरोजगार प्रेरकांचा विचार करून निर्णय घ्यावा हि विनंती अन्यथा प्रेरक प्ररीका यांच्या वतीने भविष्यात तीव्र अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
            त्यानुसार 8 सप्टेंबर जागतीक साक्षर दिनी प्रेरकांना पढना अभियानात समाविष्ट न केल्याचा निषेर्धात जिल्हा संघटक दत्तात्रय मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शेअर करा
Exit mobile version