Site icon सक्रिय न्यूज

बदामराव पंडित यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी सुरू केला मदत कक्ष……!

बदामराव पंडित यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी सुरू केला मदत कक्ष……!
गेवराई दि.८ ( देवराज कोळे ) तालुक्यात गेल्या 10 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्येक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका शेत जमीन व पिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. पूर परिस्थितीच्या या संकट काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी  गेवराई शहरातील आपल्या शिवसेना कार्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे.
                           गेवराई तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली असून पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पडली आहेत. पाझर तलाव फुटले आहेत. ओढे, नाले, नद्यांना पूर आलेला आहे. त्यासोबतच गोदावरी व सिंदफणा या दोन मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांची उभी पिके, फळबागा जमीनदोस्त झाले आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस जोरदार पाऊस होण्याचे संकेत दिले आहेत. या संकट काळात नागरिकांना तात्काळ मदत मिळावी त्यांच्या अडीअडचणी प्रशासकीय पातळीवर सोडविण्यासाठी गेवराई शिवसेना कार्यालयात शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मदत कक्ष सुरू केला असून, त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तैनात केले आहेत. नागरिकांना काही अडचण आल्यास पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेख एजाज– 9822861111, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे– 9822273444, शहर प्रमुख शिनुभाऊ बेदरे– 9422244460, शिवसेना सोशल मीडियाप्रमुख अशोक नाईकवाडे– 9284625210 , प्रल्हाद कोकाट– 9922949917, भाऊसाहेब करांडे– 8390453500, बंडू गायकवाड– 7588596516, किसन बांगर– 9763424315 , हनुमान धुमक– 9673144611,  राजेश घल्लाळ– 7020616342, दत्तात्र्येय सकुंडे– 8275521243, रामदास वंजारे– 9420379684 , अशोक भालेराव– 992105137, संतोष केसभेट– 9096493296, गोविंद राऊत– 9511744073,
बालाजी शिंदे– 9860509555
देवराज भैय्या कोळे: 8432409595
यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version