Site icon सक्रिय न्यूज

केज येथे आयोजित लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा – न्या. बी.एस.संकपाळ

केज येथे आयोजित लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा – न्या. बी.एस.संकपाळ
केज दि.१२ –  मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व मा. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक २५ सप्टेंबर रोजी केज येथील न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश बी.एस.संकपाळ यांनी केले आहे.
               मा. उच्च न्यायालय यांच्या
आदेशानुसार व मा. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व नियमावलीचे पालन करून न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे दाखल पूर्व आपली न्यायालयात दाखल प्रकरण, बँकेची कर्ज प्रकरणे, चेक असलेली व दाखल पूर्व प्रकरणे, चेक बाबतची प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर पंचायतची थकबाकी प्रकरणे आपसात तडजोड करून घ्यावीत.
                      तसेच घरगुती कौटुंबिक वाद, पोटगीची व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी दि.25 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे. येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटाझरने हात स्वच्छ धुवूनच पक्षकारांनी न्यायालयात प्रवेश करावा. आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश बी.एस.संकपाळ यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version