केज दि.10 – तालुक्यातील साळेगाव (ता.केज) येथे युवकाचा मृतदेह शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला आहे.
साळेगाव येथील लहू दशरथ सरवदे वय ३० वर्षे या युवकाचा १० सप्टेंबर शुक्रवार रोजी ११ वा. दरम्यान त्याच्या स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सदरील घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार अमोल गायकवाड आणि अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.