Site icon सक्रिय न्यूज

आईच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल…….!

आईच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल…….!
परळी दि.10 – मयत असलेल्या वडिलांची चेक वर बनावट सही करून महाराष्ट्र बँकेतील त्यांच्या खात्यावर असलेली ६५ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम काढून स्वतःच्या खात्यात जमा करण्याचा प्रकार परळीत उघडकीस आला. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
            परळी शहरातील मल्लीकपुरा भागात राहणाऱ्या कमरबेगम अब्दुल रौफ (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अब्दुल रहीम अब्दुल रौफ ( वय ३७) याने वडील मयत असताना चेक वर त्यांच्या बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील ६५ लाख ९२ हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा केले. याबाबत विचारणा केली असता त्याने आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा अब्दुल रहिम अब्दुल रोफ याच्याविरुद्ध कलम ४२०, ५०४, ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version