Site icon सक्रिय न्यूज

पूल खचल्याने वाहतूक बंद, दुर्घटना होण्याची शक्यता……!

पूल खचल्याने वाहतूक बंद, दुर्घटना होण्याची शक्यता……!
केज दि.११ – मध्यंतरी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. कांही ठिकाणी लहान लहान पूल वाहून गेले आहेत तर कांही पूल मोठ्या प्रमाणावर खचल्याने पुर्णतः वाहतूक बंद पडली आहे.
             तालुक्यातील सोनिजवळा व परिसरातील नागरिकांना केज शहरात येण्यासाठी सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील सोनिजवळा रोडवर असलेल्या केजडी नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर खचला आहे. सदरील रोडवरून दररोज हजारो नागरिकांची ये जा होते. मात्र मागच्या आठ दिवसांपासून सदरील पूल खचल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे. मोठं मोठे खड्डे पडल्याने पायी नदी पार करणे शक्य नाही, परंतु कांही नागरिक व दुचाकीस्वार स्वतः चा जीव धोक्यात घालून नदी पार करण्याचा प्रयत्न करत असून आतापर्यंत अनेकजण अडखळून पडले आहेत. तसेच सदरील नदीच्या काठावर स्मशानभूमी असल्याने कुणी मयत झाले तर अंत्यविधीसाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली आहे.
          दरम्यान, केज ते सोनिजवळा रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर काम सुरूही होईल. परंतु तोपर्यंत सदरील पुलावरील सिमेंट काँक्रीट चे काम तात्काळ करण्याची सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,अंबाजोगाई यांना केली आहे.
शेअर करा
Exit mobile version